Breaking News

दरोडी येथे पतीस बेदम मारहाण करून केला महिलेचा विनयभंग एकास अटक

दरोडी येथे पतीस बेदम मारहाण करून केला महिलेचा विनयभंग  एकास अटक

पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील दरोडी येथे एका महिलेचा विनयभंग करून पतीस बेदम मारहाण केल्या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि13 रोजी कुंबर ज्योत मळा, दरोडी, पारनेर येथे आरोपी बाबाजी अंकुश पावडे रा  कुंबर ज्योत मळा दरोडी तालुका पारनेर अटक आहे याने त्याचे सुरू असलेल्या गोठ्याचे ठिकाणी लाईटची मांडलेली उघडी तार टाकीत असल्याने त्यास महिलेचे पती हे घरी लहान मुले असल्याने तार लांबून घेण्याबाबत समजून सांगत असताना त्यास राग येऊन आरोपीने महिलेचे पती ला शिवीगाळ करून खाली पाडून हातात फरशीचा तुकडा धरून कपाळावर मारून कोच पाडली तसेच फिर्यादी महिलेला  हाताने पोटात मारून खाली पाडून, ब्लाऊज फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तुमच्या एकेकाला खतम करून टाकतो अशी धमकी दिली याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डि ए उजगरे करत आहेत.