Breaking News

ब्राम्हणगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार परत चव्हाट्यावर !

ब्राम्हणगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार परत चव्हाट्यावर !
------------
समस्या जैसे थे सरपंचाच्या राजीनाम्याची मागणी !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे पाणी वाहुन जाण्यासाठी ना गटारींची सोय ना नाल्यांची सफाई    दरवर्षी पाऊस झाला कि अनेक घरांमध्ये पाणी घुसुन ग्रामस्थांना मोठा आर्थिक फटका बसतो आजी, माजी लोकप्रतिनिधी,तहसिलदार,गटविकास अधिकारी  यांनी  ग्रामपंचायतला सांगूनही या गंभिर प्रश्नाकडे दुर्लक्ष  करत कुठलीच कार्यवाही व  कामे केली नाही या वर्षी परत पावसाचे पाणी गावात शिरुन ग्रामस्थांची तारांबळ उडाली याही वर्षी परत अधिकारी पाहणी साठी गावात तर गतवर्षीच्या आहेत्याच समस्या पाहुन अधिका-यांनाही कपाळावर हात मारण्याची  वेळ आल्याने ग्रामपंचायतचा चाललेला भोंगळ कारभार परत एकदा  चव्हाट्यावर आला असुन  कामे होत नसतील तर सरपंचांनी राजीनामा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवबा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुराग येवले व ग्रामस्थांनी केली आहे. 
   ब्राम्हणगावातील राजवाडा मातंग वस्ती अंबिकानगर तक्का येथे पाणी बाहेर निघण्यासाठी कुठलीही गटार नाही पाऊस झालाकी लगेच पाणी घरांत शिरते लोकांनी या दिवसात कसे जगावे असा मोठा प्रश्न निर्माण होतो दरवर्षी हीच समस्या.मागील वर्षी स्वतः तहसीलदार व गटविकास अधिकारी   तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी .  स्नेहलताताई  कोल्हे व आशुतोष काळे यांनी पावसाळ्यात पाहणी करून ग्रामपंचायत ला पाणी निघण्यासाठी गटारी व यां भागामध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते करण्याच्या सूचना दिल्या होत्या .नुकसान  ग्रस्तांना मदत ही दिली गेली होती अनेक लोकांचे संसार उपयोगी साहित्य धान्य या पाण्याने भिजले होते .काळे व कोल्हे कारखान्या   तर्फे जनतेला जेवणाची व्यवस्था  सुद्धा करण्यात आली होती .रात्री सामाजिक जाण असणारे अनुराग येवले यांनी स्वतः स्वखरचाने जेसीबी लावून हे पाणी काढले होते 
     तर आज ही वर्षानुवर्षे असलेली समस्या जैसे थेच आहे ग्रामपंचायत ला जर ही काम करायची नसतील किंवा त्यांना वेळ नसेल तर सरपंच यांनी सरळ राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  अनुराग येवले यांनी केली आहे .जनतेने तुम्हाला त्यांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे जर वारंवार सांगून तुम्हाला काम करायचीच नसतील तर उगाच गावचा वेळ वाया घालू नका व विकास खुंटवू नका सरळ नैतिकता दाखवत राजीनामा द्या ... फक्त खुर्ची आणी पदाच्या लालसे पाई जनतेचे आणी गावचे नुकसान  करू नका अशी मागणी त्यानी केली आहे मासिक मिटिंग पुरते फक्त सरपंच उपस्थित  राहतात बाकी महिन्यातील २९ दिवस ही खुर्ची खाली असते असाही त्यानी गंभीर आरोप केला आहे .
दरम्यान सध्या झालेल्या पावसाचे पाणी गावातील रहिवास्यांच्या घरात शिरले त्याची पहाणी गटविकास अधिकारी व तहसिलदारांनी केली असुन परत काही सुचनाही केल्या आहे.