Breaking News

कोपरगावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा नगरसेवक जनार्दन कदम यांची मागणी !

कोपरगावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा  नगरसेवक जनार्दन कदम यांची मागणी !


 कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
    कोपरगाव नगर परिषदेच्या  प्रभाग 2 मध्ये    मागील गेल्या तीन महिन्यापासून मोकाट जनावरे. गाढवे व कुत्र्यांचा  मोठ्या प्रमाणात वावर  वाढलेला आहे त्याबाबत आरोग्य विभाग प्रमुख यांना वारंवार फोनवर व्हाट्सअप दारे फोटो टाकून याबाबतची कल्पना दिलेली होती त्याबाबत कुठलीही ठोस कार्यवाही केली जात नाही व  पालिका प्रशासनाकडून झालेली नाही नगर परिषद एखांदा बळी जाण्याची वाट पाहते काय असा उदीग्न सवाल प्रभाग २ चे नगरसेवक जनार्दन कदम यांनी करत या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
  दिलेल्या निवेदनात नगरसेवक जनार्दन कदम यांनी  म्हटले आहे की  मागील तीन दिवसांमध्ये याच मोकाट जनावरांना कडून  नागरिकांवर प्राणघातक हल्ले सुरू झालेली आहे दोन दिवसापूर्वी दोन नागरिक या मोकाट जनावरांच्या हल्ल्यातून जखमी झालेले आहे तसेच मागील आठवड्यात एका लहान मुलाला मोकाट कुञ्या कडून ओरबडण्याचा प्रयत्न झाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले,  आज तर सकाळी कोपरगाव नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यावर मोकाट जनावरांनी प्राणघातक हल्ला केला नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिची त्यातून सुटका केली पालिका प्रशासनाकडून हा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही समस्या मांडायची कुणासमोर? माननीय नगराध्यक्ष मुख्याधिकारी व आरोग्य प्रमुख आपण एखाद्या नागरिकांचे जीवित हानी होण्याची वाट पाहत आहात का? माननीय नगराध्यक्ष मुख्याधिकारी व आरोग्य प्रमुख  यांनी  लवकरात लवकर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त  करावा व नागरिकांचा मोकळा श्वास करून द्यावा  अशी कळकळीची विनंती नगरपरिषदेचे प्रभाग २ चे नगरसेवक  जनार्दन कदम यांनी केली आहे