Breaking News

दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुल प्रीत यांची ड्रग्ज प्रकरणात तीन दिवसांत चौकशी!

 - हजर राहण्यासाठी एनसीबीकडून समन्स जारी


मुंबई/ प्रतिनिधी 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांना समन्स बजावले आहे. या अभिनेत्रींना पुढील तीन दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागेल.

तत्पूर्वी, एनसीबीने मंगळवारी क्वान या टॅलेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीची सुमारे सहा तास चौकशी केली. यावेळी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीबीने रिया आणि शोविकसह सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, मदतनीस दिपेश सावंत आणि अनेक ड्रग्ज पेडलर्ससह 20 जणांना अटक केली आहे. विशेष कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मिरांडा, सावंत आणि ड्रग पेडलर अब्दुल बासित परिहार यांनी उच्च न्यायालयात अपील केली आहे. त्यांच्या अर्जावर हायकोर्टात पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी आहे.

---------------------