Breaking News

अकोले तालुक्यात आज नवीन १८ करोना रुग्णांची भर !

अकोले तालुक्यात आज नवीन १८ करोना रुग्णांची भर
---------------
 कोतुळ येथे एकाच दिवशी आढळले १२ पॉझिटिव्ह रुग्ण !अकोले  /प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज १८ नवीन कोरोनाला  रुगणांची भर पडली एकाच दिवशी कोतुळ येथे १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोतुळ पुन्हा हॉट स्पॉट बनले आहे 
 आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये कोतुळ येथील ५५ वर्षीय पुरूष, २१ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महीला,३० वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,४९ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,१७ वर्षीय तरुण,२:५ वर्षीय मुलगा,०२ वर्षीय मुलगा,मोग्रस येथील ३३ वर्षीय महिला,ब्राम्हणवाडा येथील ४४ वर्षीय महीला, ४० वर्षीय पुरूष, ०८ वर्षीय मुलगा,राजुर येथील ४५ वर्षीय पुरूष, २० वर्षीय महीला,अशी आज एकुण  १८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या  ११४३ झाली आहे. 
कोतुळ,ब्राम्हणवाडा व राजुर येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट तर खानापुर कोविड सेंटर येथे ६५ व्यक्तीचे स्वॅब घेऊन अहमदनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे

------