Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३५ रुग्णाची भर तर १५ कोरोना मुक्त, एक मृत्यू !

कोपरगाव तालुक्यात ३५ रुग्णाची भर तर १५ कोरोना मुक्त, एक मृत्यू


करंजी प्रतिनिधी-
    आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २५ बाधित तर ८९ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच नगर येथील अहवालानुसार ५ रुग्ण तर खाजगी लॅब च्या अहवालात ५ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात १४ तर ग्रामिण २१ रुग्ण आढळून आले आहे

साई सिटी-१
महादेव नगर-९
निवारा-१
मांढरे बिल्डिंग-१
खाटीक गल्ली-१
गोकुळ नगरी-१
धामोरी-२
उक्कडगाव-१३
संजीवनी-३
येसगाव-१
चासनळी-१
खोपडी-१

असे आज १५ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३५ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १५ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ३४ स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १३३४ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६७ झाली आहे.


आज रोजी कोपरगाव शहरातील सुभाष नगर येथील ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून त्या मुळे पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २४ झाली आहे.