Breaking News

कंगणाला जास्त महत्त्व देऊ नका!

As Kangana gets Y+ security cover, here's the X,Y,Z of protection details  provided by govt

- मातोश्रीवरून देण्यात आल्या सूचना

मुंबई/ प्रतिनिधी

अभिनेत्री कंगणा राणौतच्या पाली हिलमधील कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई केल्यानंतर कगणाने थयथयाट चालवला आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी सर्व प्रवक्त्यांना या विषयावर न बोलण्याची सूचना केली आहे. तसेच, कंगणाला महत्व न देण्यास सांगितले आहे.

कालच मुंबई महापालिकेनं कंगणाच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली होती. कार्यालयात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले होते. नोटिशीत दिलेली 24 तासांची मुदत संपल्यानंतर पालिकेने बुधवारी सकाळपासून कारवाईला सुरुवात केली व बहुतांश बांधकाम पाडले. दुपारनंतर कंगणाच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आणली. यानंतर हिमाचल प्रदेशातून मुंबईकडे निघालेल्या कंगणानेट्वीटरवर थयथयाट केला. शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. याबद्दल कंगणा आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर कुठेही बोलू नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. ‘कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका. तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यावर कोणतेही विधाने करू नका,’ अशा सूचना मातोश्रीवरून देण्यात आल्या आहेत.


कंगणाच्या कार्यालयावर हातोडा

कंगणा राणावत मुंबईत येण्यापूर्वीच तिच्या जुहू येथील कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली. कंगणाच्या कार्यालयाचे अनधिकृतरित्या केलेले बांधकाम महापालिकेने तोडले. ही कारवाई सुरु असताना कंगणाने मुंबईला पुन्हा पाकिस्तान म्हटले. तसेच, महापालिकेला बाबराची फौज असे म्हणाली. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.