Breaking News

विद्युत कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांने घेतली चार हजार रुपयांची लाच !

विद्युत कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांने घेतली चार हजार रुपयांची लाच !
---------------
पोल्ट्री शेड चा कनेक्शन साठी मागितली होती लाच अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !


पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे चार हजार रुपये लाच घेताना विद्युत महामंडळ सहाय्यक अभियंता यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी रंगेहात पकडले आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भाऊसाहेब गोविंद पगारे वय 44 वर्ष धंदा सहाय्यक अभियंता भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर राहणार विन बंगलो शिवनगर पाईपलाईन रोड अहमदनगर यांनी कैलास अण्णासाहेब शिंदे वय 40 वर्षे धंदा शेती राहणार आदर्श नगर जामगाव व त्यांचे मित्र सोनवणे यांनी भागीदारीत असलेले जामगाव गावातील पोल्ट्री शेड साठी वीज कनेक्शन देण्यासाठी म्हणून दिनांक 28 रोजी फिर्यादी यांनी लाच मागणीबाबत नोंदविलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान फिर्यादी यांच्याकडे पंच साक्षीदार क्रमांक एक श्री मस्के यांचे समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती चार हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून ती लाचेची रक्कम दिनांक 28 रोजी आयोजित सापळा कारवाईदरम्यान पंच नंबर एक श्री मस्के यांचे समक्ष फिर्यादी यांचेकडून भाळवणी या कार्यालयात 4 :15 च्या सुमारास  स्वीकारून स्वतःचा  सांपत्तिक फायदा करून घेऊन  गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले म्हणून फिर्यादी यांची  आरोपी लोकसेवक  याचे विरुद्ध  रजिस्ट्री दाखल करण्यात आली आहे 
       पुढील तपास पोलीस निरीक्षक  दीपक करंडे  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  अहमदनगर हे करीत आहेत फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.