Breaking News

कोंबड्या चोरांनी कोंबड्याची चोरी करुन केली बिर्याणी पार्टी! वडझिरे गावात या घटनेची 'रुचकर" चर्चा !

कोंबड्या चोरांनी कोंबड्याची चोरी करुन केली बिर्याणी पार्टी!
वडझिरे गावात या घटनेची 'रुचकर" चर्चा.
---------
वडझिरे येथून 14 कोंबड्यांची चोरी करून डोंगरावर पार्टी केली असल्याचे ग्रामस्थ सांगतात.


पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील निघुट मळा परिसरामध्ये दत्तात्रय फकिरा निगुट यांच्या 14 कोंबड्यावर
काल 2 रात्री च्या सुमारास चोरट्यांनी ताव मारला कोंबड्यांची चोरी करून चोरांनी रात्रीच डोंगराचा आश्रय घेत दारु व बिर्याणी पार्टी केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत त्या परिसरामध्ये पार्टी केली असल्याचे निशान आहे त्यामुळे चोरांनी चोरी करून खमंग पार्टीचा आस्वाद घेतला मात्र शेतकऱ्याचे सात हजार रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
रात्रीचा व मळ्यात वस्ती असल्याचा फायदा घेत वडझिरे येथे दत्तात्रय निघूट ह्यांच्या घरी खुराड्यात असलेल्या गावरान कोंबड्यांची चोरी झाली.14 कोंबड्या चोरीला गेल्या रात्री येत असलेल्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली कोंबड्याची किंमत अंदाजे 7000 रुपये आहे.
तसेच स्वयंपाक घराचे कुलूप तोडून घरातले मसालेसुद्धा नेले तेलाचा डब्बा नेता आला नाही म्हणूम तेल ओतून नेले एकूण आठ ते दहा चोर असण्याची शक्यता आहे त्यांनीही चोरी बिर्याणी पार्टी करण्यासाठी केली असल्याची माहिती समोर येत आहे वडझिरे परिसरामध्ये या चोरीची खमंग चर्चा सुरू असून जवळच असणाऱ्या डोंगरावर चोरट्यांनी की पार्टी केली असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
14 कोंबडयाची बिर्याणी करून डोंगरावर त्याची पार्टी केली असल्याची माहिती समोर येत आहे त्या परिसरामध्ये पार्टी केली असल्याचे निशाण आहे जवळच तिथे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत.
कोंबड्या चोरांची परिसरामध्ये चर्चा होत असून नेमके कोंबड्या चोरांचा थांगपत्ता नाही परिसरातील भागातील जोर असण्याची नागरिकांनी शक्यता वर्तवली आहे.