Breaking News

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे - सभापती गणेश शेळके

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे - सभापती गणेश शेळके
------------
तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची केली मागणी


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्राप्त होणारा निधी लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून प्राप्त न झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबाची आर्थिक घडी सध्या विस्कटली आहे त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान त्वरित जमा करावे अशी मागणी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी निवेदनाद्वारे तलहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे  केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि कोरोनाच्या परिस्थिती मध्ये एकीकडे लोकांना काम नाही आणि दुसरीकडे लोकांचे हातावर पोट आहे गोर गरीब जनतेला कुटुंब जगण्यासाठी अनुदान वेळेवर मिळणे गरजेचे आहे ते जर वेळेत मिळाले नाही तर लाभार्थ्यांना खूप अडचणी निर्माण होतात अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह या अनुदानावर अवलंबून आहे दोन महिन्यापासून अनुदान आले नसल्यामुळे अनेक नागरिक बँकेमध्ये वारंवार चौकशी करतात मात्र बँक खात्यात अनुदान उपलब्ध न झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा अपंग परित्यक्ता अनाथ श्रावण बाळ निराधार आदी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 1000 रु अनुदान मिळत असते मात्र जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे अनुदान सध्या प्राप्त झाले नाही त्यामुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत तालुक्यांमध्ये जवळपास 34 हजार या योजनेचे लाभार्थी आहेत मात्र अनुदान वेळेत खात्यावर जमा न झाल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे तरीही अनुदान खात्यावर जमा नसल्याने लाभार्थी चिंतेत पडले आहेत त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून त्वरित याबाबत पाठपुरावा करून संबंधिताच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
 यावेळी पंचायत समितीचे सदस्य डॉ.श्रीकांत पठारे,विजय डोळ,उपशहर प्रमुख संदीप मोढवे आदी शिवसैनिक उपस्थित होते.