Breaking News

कोपरगाव काँग्रेस कमिटी जुनी इमारतीची पुनर्रचना करा !

कोपरगाव काँग्रेस कमिटी जुनी इमारतीची पुनर्रचना करा


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
       कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कॉग्रेस कमिटीची कॉग्रेस भवन या नावाने जुनी इमारत आहे सध्या ती जिर्ण अवस्थेत आहे त्या ईमारतीच्या आजुबाजुला अतिक्रमणे होती ती नगरपालिकेने गत महिन्यात काठली तरी कॉग्रेस भवन ला उर्जित अवस्था अनण्यासाठी कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालावे असे निवेदन कोपरगाव कॉग्रेस च्या पदाधीका-यांनी दिले आहे.
महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची कोपरगाव  काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोकराव खांबेकर, जिल्हा युवक काँग्रेसचे तुषार पोटे,शहराध्यक्ष सुनील साळुंके तसेच इतर पदाधिकार्यांनी भेट घेऊन या कॉग्रेस भवन इमारती  विषयी  चर्चा करुन निवेदन दिले यावेळी महसुलमंञी बाळासाहेब थोरात यांनी  पक्षाच्या त्या वास्तू बद्दलच्या आठवनींना उजाळा देत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ चौकशीचे आदेश देऊन लवकरात लवकर नूतन वास्तूच्या पुनर्रचने बाबत आश्वस्त केले.