Breaking News

शेततळ्यात पोहता पोहता ६ वर्ष मुलाचा बुडून मृत्यू !

शेततळ्यात पोहता पोहता  ६ वर्ष मुलाचा बुडून मृत्यू !


सुपा प्रतिनिधी : 
      पारनेर तालुक्यातील रांजनगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला इयत्ता ६ वी च्या मुलाचा  बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. राहूल रामदास जवळ वय १३ (इयत्ता ६ वी) असे या मुलाचे नाव आहे. त्यास वाचवण्यासाठी गेलेला भाऊ ऋतिक सतिश जवक याने मदतीसाठी आरडाओरडा केला  दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी त्या दोघा भावांना बाहेर काढले यात राहूल वाचू शकला नाही .आणि दुसरा भाऊ ऋतिक यास खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
     हे शेततळे खोल असून त्यातून बाहेर निघताना घसरुन तळाला गेल्याने मृत्यू झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे.