Breaking News

कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलाला नोकरीस लावतो म्हणून महिलेचे शारीरिक शोषण ; नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलाला नोकरीस लावतो म्हणून महिलेचे शारीरिक शोषण ; नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !


भिंगार प्रतिनिधी :
     येथील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डात तुमच्या मुलात नोकरी लावतो, असे सांगून महिलेचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी एका महिलेने अहमदनगर भिंगार छावणी परिषद येथील शिशिर पाटसकर याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 
      याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार छावणी परिषद येथे कामाला असणारा शिशिर पाटसकर याने 'तुमच्या मुलास कॅन्टोन्मेंट बोर्ड भिंगार अहमदनगर येथे नोकरीस लावतो' असे म्हणून तो मला ऑफिसला बोलवत होता. यानंतर २०१७ मध्ये माझे कोर्टात काम आहे. तू नेवासा कोर्टात ये. यामुळे मी बसने नेवासा येथे गेले. यानंतर त्याने मला बाजूला नेऊन माझ्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. परंतु माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न असल्याने मी झालेल्या घटनेची माहिती कोणाला दिले नाही. यानंतर २०१८ मध्ये पाटसकर येणे तुमच्या मुलाच्या नोकरीबाबत बोलायचं आहे, असे म्हणून मला एमआयडीसी,अहमदनगर जवळील हॉटेलवर बोलून घेतले येथेही त्याने बळजबरीने माझ्यावर अतिप्रसंग केला. यानंतर तू मला भेटत नाही. माझ्यासोबत चल नाहीतर मी आता गावभर तुझी बदनामी करेल, असे म्हणाला, अश्या महिलेच्या फिर्यादीवरून शिशिर पाटसकर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहित १८६० अन्वय ३७६(२), ३७६(२)(क), ३७६ कलमान्वये नेवासाची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.