Breaking News

'कोरोना सोडून नको त्या विषयांवर आपण चर्चा करतोय'; उर्मिला मातोंडकर संतापली !

Man booked for obscene post on Urmila Matondkar | Entertainment News,The  Indian Express

 मुंबई | राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशाच्या याच परिस्थितीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.

उर्मिला म्हणते, देशातील कोरोनाबाधित रूग्ण संख्येने 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र आपण कोरोना सोडून इतर सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालत असल्याचं म्हटत उर्मिला मातोंडकरने नाराजी व्यक्त केली आहे.

उर्मिलाच्या सांगण्यानुसार, 'देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ४२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत आपल्या भारत देशाने ब्राझिलला मागे सोडलं आहे. पण या विषयामध्ये कोणालाही रस दिसत नाही. आपण नको त्या विषयांवर चर्चा करत बसलोय.'

सध्याच्या घडीला देशात कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 89,706 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 1115 रूग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.