Breaking News

पारनेर तालुक्यातील आज २० अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील आज २० अहवाल पॉझिटिव्ह !


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार २० व्यक्तींना कोरोना ची लागण झाली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये तालुक्यातील देवीभोयरे ७ पारनेर ३ राळेगण सिद्धी १ वासुंदे १ कळस १ ढवळपुरी १ आळकुटी १ राळेगण थेरपाळ २ पठारवाडी १ लोणीमावळा १ कान्हूर पठार १ यागावांतील व्यक्ती चा समावेश आहे.
तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९५० फार झाली आहे रुग्ण संख्या वाढत आहे तरीही नागरिक गांभीर्याने घेत नाही चिंतेची बाब आहे.
 तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे ते रुग्ण राहत असलेला १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.