Breaking News

सरकारने मुसक्या आवळल्या, सगळे डॉक्टर क्वारंटाईन होणार!

11 types of novel coronavirus now but only one driving pandemic, find  Indian scientists- The New Indian Express
मुंबई/प्रतिनिधी

- वैद्यकीय उपचारांवरील निश्‍चित दराला विरोध
- राज्यातील सगळे डॉक्टर क्वॉरंटाईन करून घेणार?

राज्य सरकारने कोरोनाचे उपचार देण्याकरिता खासगी क्षेत्रातील वैद्यकीय उपचारांसाठी जे काही दर निश्‍चित केले आहे, त्यामुळे डॉक्टरांवर दवाखाने बंद करण्याची वेळ असून हा अन्याय आहे. तसेच हॉस्पिटल्सच्या न परवडणार्‍या दरात थोडीशी कुचराई झाल्यास ऑडिटर पाठवून डॉक्टरांवर कारवाया केल्या जात आहेत, या सर्वांच्या निषेधाचा भाग म्हणून राज्यातील डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने सामुदायिकरित्या ’क्वॉरंटाईन’ (विलगीकरण) करून घेण्याचा निर्णय घेतला असून, या क्वॉरंटाईनची मुदत 14 दिवसांपर्यंत असू शकेल, असे म्हटले आहे. अशा पद्धतीने डॉक्टरांनी राज्य सरकारला कोंडित पकडण्याचा डाव रचला असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या या काळात सामान्य जनतेला वैद्यकीय उपचार परवडावेत म्हणून, शासनाने कोरोनासाठी लागणार्‍या उपचाराचे दर निश्‍चित केले आहेत. शिवाय, जर या नियमाचा कुणी भंग केल्यास त्यावर रीतसर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र शासनाने जे दर ठरविले आहेत. त्यामध्ये दवाखाने चालविणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, हॉस्पिटल्सच्या आयसीयुकरिता ठरवलेल्या सध्याच्या दरामध्ये ऑक्सिजन, पीपीई किट्स, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, कर्मचार्‍यांचे पगार, निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे हॉस्पिटल्सना अवघड होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 25 हजार हॉस्पिटल्सपैकी बहुसंख्य हॉस्पिटल्स बंद पडण्याची वेळ आलेली आहे. त्याकरिता हे दर वाढवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, आणि त्यात आयएमए समवेत चर्चा करून हे दर वाढवण्याबाबत 31 ऑगस्टपूर्वी एक बैठक घेऊन ते निश्‍चित करण्याचे ठरवले होते. मात्र तशी बैठक न घेता राज्याच्या आरोग्य सचिवांनी 31 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून हे दर कायम ठेवले आणि त्यात आणखीन इतर गोष्टींची भर घालून ते परवडण्याच्या दृष्टीने आणखीन अवघड करून ठेवले. याबद्दल आयएमए महाराष्ट्र राज्याने 1 सप्टेंबर रोजी या दरांबाबत ठरवलेल्या बैठकीचे स्मरण देऊन पुढील तीन दिवसांत आयएमएसोबत बैठक घेऊन या दरात फेरचर्चा करण्याची विनंती केली, परंतु आजपावेतो राज्य सरकारने त्याबाबत काहीही उत्तर दिलेले नाही. या अशा काळात संपावर जाणे उचित नाही याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. आम्ही रुग्णांना वार्‍यवर सोडू शकत नाही. मात्र आमच्यावर होत असल्याच्या अन्यायाबाबत आम्ही शासनासची भेट घेऊन चर्चाही केली आहे. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आहे. त्याकरिता आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला न्याय मिळाला नाही तर शेवटचे पाऊल म्हणून आम्हा डॉक्टरांनासुध्दा आता सामुदायिक रित्या ’सेल्फ क्वॉरंटाइन’ करून घ्यावे लागणार आहे, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

----------------