Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात ७०६ रुग्णांची कोरोनावर मात

 

अहमदनगर, - जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून या सर्व रूग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल २५४३७ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. शनिवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील २०२ जणांसह संगमनेर ७१, राहाता ६०, पाथर्डी ४३, नगर तालुका ३५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा ४४, श्रीगोंदा २७, पारनेर २६, अकोले ४२, राहुरी ३०, शेवगाव ११, कोपरगाव ३९, जामखेड १९, कर्जत १७ व इतर जिल्हा २ अशा रूग्णांचा समावेश आहे.