Breaking News

"नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?"

 

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस जिल्ह्यात 20 वर्षीय दलित मुलगी गँगरेपची शिकार झाली आहे. देशभरातून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंवर निशाणा साधला आहे.

नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळणार का? न्याय मिळण्यासाठी नटीच हवी का?, ती पीडिता कोणालाही आपली वाटत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.