Breaking News

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन उताऱ्यातील चुका त्वरित दुरुस्त व्हाव्यात!

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन उताऱ्यातील चुका त्वरित दुरुस्त व्हाव्यात!
----------------
२०१८ रब्बी पीकविमा मंजूर होऊनही पैसे खात्यावर जमा नाही !
--------------
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले निवेदन.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील चुका त्वरित दुरुस्त कराव्यात व सन 2018 रब्बी पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही याबाबत पारनेर तालुका युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले आहे.
पारनेर तालुक्यातील सातबारा ऑनलाइन करताना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उताऱ्यामध्ये चुका झाल्या आहेत त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे व क्षेत्र चुकीचे लागले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच पीक विमा भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत अनेक शेतकरी तलाठ्याकडे वारंवार याबाबत मागणी करत आहेत मात्र कोरोना मुळे इतर कामे असल्याचे त्यांना सांगण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तसेच तालुक्यांमध्ये 2018-19 रब्बी चा पिक विमा मंजूर होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत यासाठी आपण विशेष लक्ष घालावे व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे योगेश शिंदे यांनी केली आहे यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्वरित या बाबींची दखल घेऊन कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी निवेदन देताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे, काँग्रेस नेते धोंडिभाऊ शिंगोटे, तुकाराम रोकडे, सोमनाथ वाकचौरे आदी उपस्थित होते.