Breaking News

धन्वंतरी पतसंस्थेने दायित्व जोपासले

धन्वंतरी पतसंस्थेने दायित्व जोपासले


राज सोमवंशी  राहाता/प्रतिनिधी 
      राहाता शहराचे ग्रामदैवत श्री विरभद्र महाराजांचे मंदिरातून चोरीस गेलेले मुकुट व इतर चांदिच्या वस्तु पुन्हा नव्याने बनविणे कामी राहाता येथील धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी या करीता 21 भार चांदी ग्रामदैवत विरभद्र महाराज चरणी अर्पण केली आहे
        राहाता शहराचे ग्रामदैवत विरभद्र महाराज मंदिरातून अज्ञात चोरटय़ांनी देवांचे चांदीचे तीन मुकुट व इतर वस्तू चोरून नेल्या आहेत याबाबतची माहिती समजल्यानंतर राहाता तालुक्यातील सेवाभावी डाॅक्टर व दानशुर व्यक्तीमत्व धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी ग्रामदैवत विरभद्र महाराजांच्या मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तू पुन्हा नविन बनविण्यासाठी पुढाकार घेतला याकामी स्वतःच डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी श्री विरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ यांचेकडे 21 भार चांदीची वस्तू घेण्याकरिता धनादेश सुपूर्द केला व या चांगल्या कार्याची सुरूवात स्वतःपासून केली ग्रामदैवत विरभद्र महाराज यांचा कृपाआर्शिवाद आपणा सर्वावर आहे. आपल्या ग्रामदैवताचे चोरीस गेलेले चांदीचे दागिने नव्याने घडविण्यासाठी स्वेच्छेने भक्त व ग्रामस्थांनी पुढे येवून या कार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी डाॅ स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केली या प्रसंगी विरभद्र महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सागर सदाफळ, नपा वाडी चे सरपंच दत्तू जाधव,शिवाजी सदाफळ, प्रवीण सदाफळ,गंगाराम बनकर, बाळासाहेब नवाळे, दिलीप वाघ, सोमनाथ भगत, अरुण मेहेत्रे, राधकीसन भुजबळ, , मनीष चितळकर, गणेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते
> चौकट
> नैसर्गिक आपत्ती असो अथवा इतर आपत्कालिन  संकट याप्रसंगी सामाजिक दायित्व नैतिकता  म्हणून नेहमीच निस्वार्थी भावनेतून मदतीचा हात देणाऱ्या डाॅ. के. वाय. गाडेकर परिवाराने ग्रामदैवत विरभद्र महाराज मंदिरातील चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तू बनविण्या कामी आपला सहभाग म्हणून 21 भार चांदी विरभद्र महाराज चरणी अर्पण करून विरभद्र महाराज चरणी असलेली आपली श्रद्धा व भक्ती जपताना अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील आपले दायित्व जोपासले आहे