Breaking News

तळीरामाने रुग्णवाहीनी बोलवली, पत्नीने माफी मागून परत पाठवली !

तळीरामाने रुग्णवाहीनी बोलवली, पत्नीने माफी मागून परत पाठवली !


देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
      राहुरी कारखाना येथील एका नागरीकाने   108 क्रमांकास भ्रमणभाषवर संपर्क साधुन मला कोरोना झालाय दवाखान्यात न्या. त्या नागरीकाच्या  एका काँलवर रुग्णवाहीनीका दारात येवून थांबली.माञ रुग्णवाहीनी आल्यानंतर तो रुग्ण नसुन तळीराम असल्याचे समजताच रुग्णवाहीनी चालकाचा पारा अनावर झाला.परंतू त्या नागरीकाच्या  पत्नीने वरीष्ठ अधिकाऱ्यांसह रुग्णवाहीनी चालकाची माफी मागितली आणि ते दारुच्या व्यसनामुळे मनोरुग्ण असल्याचे सांगितल्याने  रुग्णवाहीनीने युटर्न घेतला.
                या बाबत सविस्तर  माहिती अशी की, राहुरी कारखाना येथील आंबिकानगर भागातील एका व्यक्तीने  दारुच्या व्यसनाच्या आहरी गेल्याने मनोरुग्ण झाल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले.नशेत त्यांनी रुग्णवाहीनी  बोलावून घेतली. बुधवारी दुपारी 4;30 ते 5 वाजण्याच्या सुमारास   108 क्रमांकास भ्रमणभाषवर संपर्क साधुन  मला कोरोना झालाय मला दवाखान्यात न्या असे सांगुन रुग्णवाहीनी बुक केली. रुग्णवाहीनी त्यावेळी राहुरीत असल्याने  रुग्णवाहीनी चालकाने वेळ नदडवता तातडीने रुग्णवाहीनी राहुरी कारखाना  येथे दाखल झाली. 
                 पत्नीने भ्रमणभाषवरुन संपर्क साधुन माफी मागितली ते मनोरुग्ण  आहेत त्यांच्याकडून चुक झाली  मी त्यांच्या वतीने माफी मागते.या गोष्टीवर पडदा टाकून  रुग्णवाहीनी चालकाने रुग्णवाहीनी घेवून निघून गेला.
                   याच दारुड्याने यापुर्वी असाच प्रकार केला होता.असाच वारंवार प्रकार घडत असल्याने खरोखर ज्यांना रुग्णवाहीनी खरोखर गरज त्यांना या प्रकारामुळे रुग्णवाहीनी मिळत नाही.