Breaking News

अकोल्यात आज १८ नवीन कोरोना रुग्णांची भर !

अकोल्यात आज १८ नवीन कोरोना रुग्णांची भर !


 अकोले प्रतिनिधी 
    काल बुधवारी  अकोले तालुक्यात १८ कोरोनाला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आज गुरुवारी अकोले तालुक्यात पुन्हा १८  रुग्णांची भर पडली.
   अकोले शहरातील कारखाना रोड,माळीझाप ,धुमाळवाडी, कुंभेफळ,विठा,कळस,वारंघुशी, धामणगाव पाट येथे  बाधित रुग्ण आढळले.
   आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील माळिझाप येथील २६ वर्षीय महीला, कारखानारोड येथील ३४ वर्षीय महीला,१४ वर्षीय मुलगी,धुमाळवाडी येथील ५६ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, ५३ वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला, १२ वर्षीय मुलगी,
 कळस येथील ४० वर्षीय महीला,कुंभेफळ येथील ५६ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष,  ४२वर्षीय महीला,४० वर्षीय महीला विठा येथील. ६० वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरुष,वारंघुशी येथील ३० वर्षीय पुरूष, धामणगावपाट येथील ३९ वर्षीय पुरूष अशा आज गुरूवारी एकुण १८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५९६ झाली आहे त्यापैकी ५०३ रुग्ण उपचारा नंतर  घरी गेले. तर ८२ रुग्णा वर उपचार सुरु आहे.
------