Breaking News

कोल्हार भगवतीपुर गाव गुरुवार पासून चार दिवस कडकडीत बंद !

कोल्हार भगवतीपुर गाव गुरुवार पासून चार दिवस कडकडीत बंद !

कोल्हार प्रतिनिधी :
     कोल्हार भगवतीपुर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपुर ग्रामपंचायत व कोल्हार भगवतीपुर व्यापारी असोसिएशन यांची सोमवारी दुपारी चार वाजता कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्ट च्या भक्तनिवास हॉलमध्ये संयुक्तिक बैठक पार पडली .
या बैठकीत कोल्हार भगवतीपुर गाव गुरुवार दिनांक 10/9/ 2020 ते रविवार दिनांक 13/9/ 2020 पर्यंत  कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारपासून म्हणजे दिनांक 14/ 9/2020 पासून सर्व व्यवसाय व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 ऐवजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील असे सर्वानुमते ठरवण्यात आले .
या बैठकीस ॲड.सुरेंद्र खर्डे, रावसाहेब कमळाजी खर्डे ,ज्ञानेश्वर खर्डे, व्यापारी असोसिएशनचे संजय शिंगवी ,सुधीर खर्डे, अनिल हिरानंदानी ,पंढरीनाथ खर्डे , अनिल कोळपकर , शिवकुमार जंगम कोल्हार भगवतीपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय घोलप यांच्यासह व्यापारी व  व्यावसायिक उपस्थित होते.
लॉक डाऊन च्या काळात दोन्ही गावातील भाजीपाला, फळांची दुकाने तसेच संध्याकाळी चालणारी चहाची दुकाने ,चायनीज ,पावभाजी सेंटर व्हेज नॉनव्हेज हॉटेल ,परमिट रूम हे देखील बंद ठेवण्यात येतील .
कोल्हार गावातील व्यापाऱ्यांनी ट्रान्सपोर्ट मधून कोणताही माल या काळात बोलू नये असे आव्हान ही व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता सर्वांनी तोंडाला मास्क लावावे ,हाताला सॅनिटायझर लावावे व हात साबणाने स्वच्छ धुवावे असे आव्हान डॉ.संजय घोलप यांनी केले आहे.