Breaking News

राज्याला दिशा देण्या अगोदर तालुक्याला दिशा द्या - सुजित झावरे पाटील

राज्याला दिशा देण्या अगोदर तालुक्याला दिशा द्या - सुजित झावरे पाटील
----------------
जनतेला वेड्यात काढण्याचे, दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे.
--––-----------
तहसील व पोलीस ठाण्यात भांडणे सोडून कोणती कामे केली आहेत ते लोकप्रतिनिधीने दाखवावे.
-----------------
सुजित झावरे यांचे आ. निलेश लंके वर घणाघाती टीकास्त्र !


पारनेर प्रतिनिधी-
   लोकप्रतिनिधी सांगतात राज्यात माझे फार वजन आहे. रोज पेपर वाचला की राज्याला दिशादर्शक काम केल्याचे सांगितले जाते. राज्याला दिशा देण्या पेक्षा अगोदर तालुक्याला दिशा द्या, तालुक्यातील जनतेचे पहिले अश्रू पुसा. मग राज्याला काय दिशा द्यायची ती द्या. राज्याला दिशा द्यायला अजून भरपूर वेळ आहे. अशा शब्दात जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील  ( ढगेवाडी ) पळसपूर येथे सुजित झावरे पाटील यांचा पुढाकारातून बांधण्यात आलेल्या गव्हाळी बांधऱ्याचे  जलपूजन शनिवारी सकाळी करण्यात आले. त्यावेळी बोलताना झावरे यांनी राज्य सरकारसह आ. लंके यांच्या वर जोरदार टीका केली.एक वर्षाच्या आत बंधाऱ्याचे काम पूर्ण झालेले असून  पहिल्या पावसाळ्यातच सदर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. 
यावेळी गावातील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव सदर गव्हाळी बंधाराचे जलपूजन सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक खंडूजी भाईक, मोहनराव रोकडे, सरपंच माधवराव पवार, मा चेअरमन सीताराम पवार, भास्करराव ढोले, गणपत पवार, हनुमंत पवार, सुदाम गाजरे, बी व्ही आहेर सर, संजय आहेर, धोंडिभाऊ डोंगरे,विठ्ठल डोंगरे, पोपटराव पवार, रामदास ढोले, संतोष डोंगरे, विशाल ढेंगे, सतीश आहेर, धोंडिभाऊ चव्हाण, बाबाजी डोंगरे, सखाराम डोंगरे, भाऊसाहेब पवार, अभय आहेर, पंकज आहेर, रोहिदास डोंगरे, पिराजी आहेर, सावळेराम डोंगरे, रेवजी आहेर, गोरख डोंगरे,  बाळासाहेब डोंगरे, बबनराव डोंगरे, बाजीराव डोंगरे, बाळू पोपळघट तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झावरे म्हणाले की, राज्यात तुमचे वजन आहे असे म्हणताना, मग तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे राहिले आहेत त्यांचे पंचनामे करा. ज्याचे पंचनामे झाले आहेत त्यांना भरपाई देण्यास सांगा. कुठेही गेले की सांगतात अजून ही माझ्या हातात मातोश्रीचा धागा आहे. दुसरीकडे गेले तर त्यांची भूमिका वेगळीच असते. तुमचे वजन असेल तर ते वापरून शेतकऱ्यांना मदत मिळाली तर मी कौतुक करील.
नवऱ्याने मारले पावसानं झोडपल अशी तालुक्याची आज अवस्था झालेली असल्याची टीका झावरे यांनी केली प्रत्येक निवडणुकीत जनतेला पर्याय हवा असतो पर्याय चुकलं किंवा नाही हे आता जनताच ठरवेल मी वर्षभरात नऊ बंधारे बांधली आधी काम केले मग सांगितले तालुक्याला विकासाच्या उंची वर नेण्याचे काम कोणतीही महत्वकांक्षा डोळ्यासमोर ठेऊन मी काम करत नाही. दुसरी कडे गेल्या वर्षात लोकप्रतिनिधी चे एक काम दाखवा मी माझी सर्व कामे दाखवितो तहसील, पोलीस ठाण्यातील भांडणे सोडून कोणती कामे लोकप्रतिनिधीने केली ते दाखवावे.
इंजिनिअरिंग कॉलेज तिसऱ्याच, शासनाच्या पॅकेज मधून जेवण, आश्रमशाळेच्या कॉट, औषधे सरकारने दिलेले मग कोव्हिडं सेंटरला स्वतः चे नाव का वापरता? सर्व उपकरणे ही शासनाचीच आहे. मी पणा अहंकार इतका वाढला आहे की त्याच्यावर बोलणार नाही. जनतेला वेड्यात काढण्याचे, दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. मी इथे जे उभे केले त्याला काम म्हणतात. मतदान केले नाही म्हणून दम दिला जातो बघून घेतो, पाहून घेतो, अशी भाषा वापरली जाते ही भाषा तालुक्याला चालत नाही वाढदिवस करणे गळ्यात हात टाकणे हे फार काळ टिकत नाही. ज्याच्यावर पोट आहे ते शाश्वत काम उभे राहिले पाहिजे.
नुकसानिचे मागील वेळीस जे पंचनामे झाले त्याचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. वनकुटे, वासुंदे, पळशी तास खडकवाडी, या सगळ्या गावामध्ये उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत सरकार त्यावर बोलायला तयार नाही सरकारला महिलांमध्ये काय इंटरेस्ट आहे हे मला कळायला मार्ग नाही कधी रिया येते, कधी कंगना येते परंतु लोकांना रियाच घेणं देणं नाही व कंगनाचही नाही राऊतच तर नाहीच नाही शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई हवी आहे असे सांगत झावरे यांनी आ. लंके याच्या सह सरकारलाही लक्ष केले.