Breaking News

निळवंडे धरण स्थळावर वृक्षारोपण करत केले जलपूजन !

निळवंडे धरण स्थळावर वृक्षारोपण करत  केले जलपूजन !


अकोले / प्रतिनिधी :
    पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेल्या निळवंडे  धरणाचे जलपूजन करत  धरण परिसरात वृक्षारोपण करण्याच्या अभिनव उपक्रम अकोले तालुका पत्रकार संघाने राबविला   पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे  अनेकांनी कौतुक केले
अकोले तालुक्यायील निळवंडे धरणामुळे  उत्तर नगर जिल्ह्यात चैतन्य आले  अनेकांचे 
संसार फुलले अनेक उद्योग धंदे कारखानदारी वाढली  निळवंडे धरण उभे करण्याचा प्रवास तसा खडतर हा प्रवास पत्रकारांनी वेळोवेळी पहिला अनुभवला नव्हे तर पत्रकार या  धरण उभारणीचे  साक्षीदार आहेत   म्हणूनच पत्रकारांनी  या  धरणाचे जलपूजन करण्याचा निर्णय घेतला  आणि जलपूजन केले   जलपूजना बरोबरच धरण परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दीर्घकाळ टिकाऊ असणारे   वड, पिंपळ  कडूलिंब  अशा  व शोभेच्या झाडांचे वृक्षारोपन केले 

  राजकीय व्यक्तींकडून धरणाचे जलपुजन होत असतेच   मात्र पत्रकांराकडून जलपूजनाचा हा अनुभव अनेकांना भावला नुसते जलपुन नाही तर धरण स्थळावर वृक्षारोपनही केले
 अकोले  तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष -विलास तुपे,सचिव- सुभाष खरबस, विश्वस्त प्रा.बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास ,गोकुळ कानकाटे, सुनील गीते,नंदकुमार मंडलिक , विनय समुद्र, राजेंद्र जाधव, , विनायक घाटकर, रमेश खरबस ,युवराज हंगेकर , संजय महानोर , नितीन शहा, आबासाहेब  मंडलिक ,भगवान पवार, सचिन खरात, आकाश देशमुख, हरीभाऊ आवारी,अण्णासाहेब चौधरी,, ललित मुतडक आदी संघाचे सदस्य उपस्थित होते
 निळवंडे धरण आता पिकनिक पॉईंट झाला आहे अनेक पर्यटक   एन्जॉय करण्यासाठी येतात   या ठिकाणी वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगा राखण्याचीही जबाबदारी संघाने घेतल्याचे अध्यक्ष विलास तुपे सचिव  सुभाष खरबस यांनी सांगितले
----------