Breaking News

झगडेफाटा परिसरात गोमांस भरलेला ट्रक पकडला !

झगडेफाटा परिसरात गोमांस भरलेला ट्रक पकडला !
-----------
कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील झगडेफाटा खडकी परिसरात नाशिककडे गोमांस भरून नेत असलेली ट्रक फेल झाल्याने उभी होती. नाशिक शिर्डी महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची याबाबत संपर्क साधला असता हा गोमांस भरलेला ट्रक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर वाहनावर पोलीस स्टेशनने कारवाई करत हे गोमांस जेसीबी मशिनच्या साह्याने खड्डा घेत पुरून टाकले.
ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हवालदार अर्जुन बाबर यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.
पोहेगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद साखरे 
यांना बोलावून घेत हे मांस नेमके कशाचे आहे याचा तपास केला असता ते गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. ट्रक चालक व वाहक  हे फरार झाले असून याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत