Breaking News

पुण्यातील कमकुवत आरोग्य यंत्रणेचा अजून एक बळी, माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन !

 पुण्यात माजी महापौरांना रुग्णालयात बेड तर नाहीच स्मशानभूमीतही मिळाली नाही  जागा | eSakal

पुणे : ज्यांनी कष्टकरी वर्गासाठी आयुष्यभर काम केले, गरिबांचे अंत्यविधी पालिकेच्या खर्चातून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, विडी कामगारांना हक्काची घरे मिळवून दिली, महापौर म्हणून आपली कारकीर्द गाजविली अशा एका माजी महापौराला उपचारांसाठी पुण्यात एकाही खासगी रुग्णालयात खाट उपलब्ध झाली नाही. ससूनमध्ये उपचार घेण्यासाठीही पालकमंत्री, खासदार यांचे दूरध्वनी जावे लागले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अंत्यविधीसाठीही तीन तीन स्मशानभूमीत त्यांचा मृतदेह फिरवावा लागला. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता. माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले

दत्ता एकबोटे यांची गरीबांचे कैवारी व लढाऊ नेते अशी समाजात प्रतिमा होती. ते समाजवादी विचारांचे नेते होते. त्यांनी समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवाससुद्धा भोगला.
आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसेम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत असत.
दत्ता एकबोटे यांची निधनानंतर सुद्धा त्याांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.