Breaking News

वाळवणे येथून १ लाख ८० हजार रुपयेची सोन्याच्या दागिन्या सह मोटरसायकल'ची चोरी !

वाळवणे येथून १ लाख ८० हजार रुपयेची सोन्याच्या दागिन्या सह मोटरसायकल'ची चोरी !


पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर तालुक्यातील वाळवणे येथून एक लाख ५५ हजार रुपये सोन्याच्या दागिन्या सह एका दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी सुपा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीबाबत ची फिर्याद आकाश भरत काळे वय- २५ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा.वाळवणे ता-पारनेर ,जि-अहमदनगर यांनी दिली आहे.
 पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाळवणे येथून दि ८ रोजी रात्री १ च्या सुमारास आकाश भरत काळे यांचे राहते घराचे बेडरूमची खिडकीची बिजागिरी उचकाटुन  कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यावाटे आत प्रवेश करून हिरो स्प्लेंडर प्लस मोसा नं   MH-१६ CN-१६४५ दुचाकी किंमत ३०,००० रु व सोन्याचे दागिने १,५५,००० रु एकूण १,८५,००० रु घरफोडी करून चोरून नेले  आहे. पुढील तपास पोलीस राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  फौजदार सी. पी. कोसे करत आहेत.