Breaking News

देर्डे को-हाळे तील पशुपालकांना लसीकरणाची प्रात्यक्षिकाव्दारे माहीती

देर्डे को-हाळे तील पशुपालकांना लसीकरणाची प्रात्यक्षिकाव्दारे माहीती
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी : 
शेतीला पुरक व्यवसाय असलेल्या दुग्ध व्यवसाय करताना पशुपालकांना जनावरांच्या  विविध आजारांना सामोरे जावे लागते वेळोवेळी लसीकरण करावे लागते ते लसिकरण कशा पध्दतीने  करावे याची तालुक्यातील देर्डे को-हाळे येथिल शेतकऱ्यांना    अजय कोल्हे यांनी  प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.     
     कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव उपक्रमांतर्गत प्रगतिशील शेतकऱ्यांना पशु लसीकरणाची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देत लसीकरण का महत्वाचे आहे हे सांगुन दुग्ध व्यासायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे किती आवश्यक असते असे न केल्यास जनावरांची कार्यक्षमता खालावते व मिळणाऱ्या उत्पादनाची पातळी ही खालावते, लसीकरांनामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही काही कालावधीसाठी वाढते म्हणून लसीकरण पुन्हा राबवण्यासाठी पशु वैद्यकीय सल्ला घ्यावा हेही त्यांनी सांगितले . यात त्यांनी जनावरांना देण्यात येणाऱ्या   विविध  लसीनंबद्दल माहितीदिली. लसिकरणासोबतच शेती क्षेत्रातील अॕप्स , माती परीक्षण, बीजअंकुरण, जनावरांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, एकात्मिक तण व्यवस्थापन, बागायती पिकांचे आधुनिक वृक्षारोपण,  पीकातील सूक्ष्म पोषक घटकांचे महत्व,बोर्डाक्स सोल्युशन, याविषयी मार्गदर्शन केले. 
  या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. कुलधर, डॉ. म्हस्के प्रा. नरोटे, प्रा.साळुके प्रा. तायडे प्रा.राठोड प्रा. कोळगे प्रा. पगारे प्रा. भोर मॅडम प्रा.शेवगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.