Breaking News

धारणगाव रोड'ची डागडुजी करण्याची मागणी !

धारणगाव रोड'ची डागडुजी करण्याची मागणी !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
छञपती संभाजी महाराज चौक ते डॉ बाबसाहेब आंबेडकर स्मारक  या दरम्यान धारणगाव रोड वर खूप खड्डे झाले असून सदर रस्त्याची नगर पालिकेने त्वरित डागडुजी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने  एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे 
    प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की  सहा महिन्यापासून सदर रस्त्यावर करोना साथीच्या आजाराने लॉक डाऊन असल्याने वाहतूक कमी होती त्यातच या वर्षी पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे डंपर जात नव्हते मात्र नुकत्याच काही दिवसांपासून झालेल्या पावसाने या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहे या रस्त्यावर कोपरगाव शहराच्या पश्चीम बाजूला जाणाऱ्या नागरिकांची तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ आहे त्यामुळे या रस्त्यावर नेहमी गर्दी असते तसेच या रस्त्यावर अनेक हॉस्पिटलमध्ये पेशंट ये जा करत असतात मात्र मोठे खड्डे पडल्यामुळे कार व मोटार सायकल चालवणे मुस्किल झाले आहे तसेच खड्ड्यात पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे 
मागील नगर पालिका निवडणुकीत स्वच्छ पाणी व सुंदर रस्ते देण्याचे आश्वासन देणारे  लोक नियुक्त नगराध्यक्ष यांच्या दुकान समोरून तर कोपरगाव शहराचे रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करून आणणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी  यांचे कार्यालय याच रस्त्यावर आहे मात्र अद्याप तरी त्यांचे लक्ष या रस्त्यावरील खड्ड्यांकडे गेले नाही हे कोपरगाव च्या जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल 
यापूर्वी देखील नगराध्यक्ष यांना मागील वर्षी या रस्त्या बाबत विचारणा करून रस्ते दुरुस्ती मध्ये हलगर्जी पणा करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई करणार होते? मात्र या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई का नाही? असे विचारले होते  मात्र मागील सहमती एक्सप्रेस च्या काळात सदरचा रस्ता झाल्याचे सांगण्यात आले होते मात्र काही का असेना 
निवडणुकी पूर्वी अनेक विकास कामाचे उदघाटने होत असतात तसेच कदाचित या रस्त्याचे उदघाटन होईलही मात्र कोपरगाव नगर पालिकेच्या निवडणुका आजून तरी लांब आहेत त्या वेळी पुन्हा गावातील रस्ते स्वच्छ सुंदर व दर्जेदार करण्याचे विकास कामाचे पुस्तक छापून येईल मात्र तूर्तास तरी सदर रस्त्यावर डागडुजी करावी अशी माफक अपेक्षा लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अॕड.नितीन पोळ,  माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के, लोक स्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष किरण अढांगळे, शहराध्यक्ष सुजल चंदनशिव, राजू रोकडे, बाळासाहेब पवार भारत रोकडे, आदींनी व्यक्त केली आहे