Breaking News

कोरोनाच्या लढाई समाजातील प्रत्येक घटक हा कोरोना योद्धाच - सरपंच व्दारकाबाई चिकणे

कोरोनाच्या लढाई समाजातील प्रत्येक घटक हा कोरोना योद्धाच - सरपंच व्दारकाबाई चिकणे 
---------------
खडकवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ 


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यात कोरोनाच्या रूग्ण संख्या वाढल्यामुळे आपली चिंता वाढली असुन आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित म्हणुन कोरोनाच्या लढाई समाजातील प्रत्येक घटक कोरोना योद्धा असल्याचे आवाहन सरपंच व्दारकाबाई चिकणे यांनी केले आहे.  
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या  'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा हा उपक्रमाचा मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवाडी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ खडकवाडीत सरपंच श्रीमती. व्दारकाबाई चिकणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सुभाष ढोकळे राजू इघे स्वाती ठुबे औषध निर्माण अधिकारी आरोग्य सह्युक राजू ठुबे पालवे दाते माया वनिता रोकडे सुरेखा साळुंके बनसोडे सिस्टर आशा स्वयसेविका हजर होत्या.
या सरपंच चिकणे म्हणाल्या की कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपापल्या भागातील जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना कोणती लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजेत.  कोणत्याही प्रकारे आजार अंगावर काढू नका. या संसर्गाची साखळी आपण सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. त्यादृष्टीनेच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे या भूमिकेतून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
या मोहिमेत कोरोनादूत घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी करुन त्यांची माहिती संकलित करणार आहेच. आज जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ टाकळी खातगाव येथून झाला. ही मोहिम २५ ऑकटोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे असे आवाहन करण्यात आलेआहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वता माझ्या कुटुंबात, परिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने आणि सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन.' अशी प्रतिज्ञा देण्यात आली.