Breaking News

पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात ५५ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात ५५ अहवाल पॉझिटिव्ह !
---------------
पारनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ


पारनेर प्रतिनिधी -
तालुक्यामध्ये कोरोना चा आलेख वाढत आहे एकूण तालुक्यातील रुग्णांची संख्या अकराशे पार झाली आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील ५५ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे तालुक्यातील ही आजपर्यंत सर्वात मोठी एका दिवसातली आकडेवारी आहे त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चा समूह संसर्ग वाढला असण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवसेंदिवस संख्या वाढताना दिसत आहे.
आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालात निघोज ७ गोरेगाव १ शहाजापूर १ वडझिरे ६ जवळा ८ भाळवणी २ देवीभोयरे १ अळकुटी ३ कोहकडी १ राळेगण थेरपाळ ५ पिंपळगाव रोठा ५ पारनेर ५ नारायणगव्हाण १ जामगाव १ लोणी हवेली २ पठारवाडी २ वाडेगव्हाण १ कुरुंद १ सुपा २ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
   रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक बेफिकीरीने वाढताना दिसत आहेत प्रशासनाने  घालून दिलेले नियमावलीचा नागरिकांकडून फज्जा उडवला जात आहे आज पोलीस निरीक्षक राजेश गवळी  व सुपाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी तालुक्यात विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहे यापुढे ही कारवाई सुरू राहील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.