Breaking News

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल!

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
-----------
शेत जमिनीच्या त्रासाला तसेच मारहाणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तालुक्यातील खडकवाडी येथील प्रकार


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील बन्सी लहानु घेमुड वय ६० यांनी दि २१ रोजी आत्महत्या केली होती आत्महत्या मारहाण केल्यामुळे तसेच शेत जमिनीच्या त्रासाला कंटाळून केली याबाबत त्यांचा मुलगा संदीप बन्सी घेमुड वय ३५धंदा शेती राहणार खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.२७ रोजी ५ वाजता सात जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ रोजी दुपारी ३.४५ वा.ते ४.३०वा चे दरम्यान बन्सी लाहाणू घेमूड  वय ६० वर्ष रा. खडकवाडी पारनेर यांनी फर्यादी याचे चुलते  प्रभाकर लहानु घेमूड  त्यांची वडिलोपार्जित शेत जमिनीच्या झालेल्या वाटण्या या पुन्हा झाल्या पाहिजे याकरिता वारंवार मागणी केल्याने व त्यामधून होणारे वाद त्याच्या  त्रासाला कंटाळून तसेच २१ रोजी प्रभाकर लहानु घेमूड व त्याची पत्नी मीराबाई प्रभाकर घेमुड, सीमा बाबासाहेब घेमूड,  वैशाली भाऊसाहेब घेमुड, सुनंदा विजय आहेर, बाबासाहेब प्रभाकर घेमुड  यांनी सामायिक रस्ता नांगरत असताना फिर्यादीचे वडिलांना केलेल्या मारहाणीमुळे त्यांचे शेत जमिनीच्या त्रासाला कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी किंवा सदर आरोपींनी त्यांना जिवे ठार मारून लटकावलेले असावे तसेच आरोपीनीं संदीप बन्सी घेमुड याच्या वडिलांना शेत जमिनीच्या वाटण्या व रस्ता नांगरण्याचे कारणावरून दिलेल्या त्रासाला कंटाळून  वडील बन्सी लाहाणू घेमूड  यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले आहे अशा प्रकारची फिर्याद मयत यांचा मुलगा संदीप यांनी दिली यावरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.