Breaking News

हॉटेल ची वेळ वाढवावी या मागणीचे शिवसेनेचे निवेदन !

हॉटेल ची वेळ वाढवावी या मागणीचे शिवसेनेचे निवेदन !


करंजी प्रतिनिधी-
      शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ५ सप्टेंबर रोजी कोपरगाव शिवसेनेचे माजी शहर प्रमुख यांनी शहरातील हॉटेल व्यवसायिकांना वेळ वाढवून मिळावी असे निवेदन आज तहसिलदार योगेश चंद्रे यांना दिले.
   या द्वारे त्यांनी प्रशासनाला विनंती केली की सध्या वाढत्या कोरोना मुळे कोपरगाव शहरातील सर्व दुकानांची वेळ ही सकाळी ९ ते ७ अशी आहे परंतु आजच्या वाढत्या कोरोना मुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी औषधोपचार घ्यावे लागते परंतु जे खेडेगावातील रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक शहरात उपचारासाठी आलेले आहे त्यांना वेळो वेळी गोळ्या औषध घेण्यासाठी वेळेवर नाश्ता जेवण करावे लागते त्या साठी गावातून वेळेत जेवणाचा डब्बा येणे शक्य नसल्याने शहरातील छोटे मोठ्या हॉटेक व्यवसाय ची वेळ ही सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत करावी जेणेकरून शुगर व इतर  रुग्णांना सकाळी वेळेत नाश्ता करून गोळ्या घेता येतील अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
   या वेळी शिवसेनेचे माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे , अंकुश वाघ , गगन हाडा , गणेश जोशी , अक्षय कानडे आदी उपस्थित होते.