Breaking News

रस्ता दुरुस्ती करा अन्यथा कार्यालयातच उपोषणाचा इशारा.

रस्ता दुरुस्ती करा अन्यथा कार्यालयातच उपोषणाचा इशारा.
---------------
शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा.


निघोज प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी- जवळा- निघोज- देविभोयरे- अळकुटी- रानमळा हा  रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक ठिकाणी मोठेमोठे खड्डे झाले आहे. या रस्त्यावरून गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. मृत्यूचा सापळाच बनलेला हा रस्ता दुरुस्ती होण गरजेचे आहे. याबाबत पारनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देउन त्वरित काम करणे गरजेचे आहे. यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

    अधिकारी उपस्थित नसल्याने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून परीस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. व त्वरित केली नाहि तर मात्र सर्व तरुणांना बरोबर घेउन सार्वजनिक बांधकाम विभागात उपोषण करण्यात येइल असा इशारा देण्यात आला. सबंधित अधिकारी यानी सकारात्मक प्रतिसाद देउन लवकरच काम सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे अनिल शेटे यानी सांगितले. लवकरच काम सुरु नाहि झाले तर मात्र तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

     या संदर्भाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.अशोक चव्हाण साहेब व नामदार राज्यमंत्री बच्चू भाऊ कडु यानाहि देण्यात आली.  यावेळी मा.अनिल शेटे,माजी उपसरपंच उमेश सोनवणे,राहुल शेटे उपस्थित होते. निवेदनावर नवशाद पठाण,सचिन कोतकर,नवनाथ बरशिले,मोहन पठारे,गणेश लंके,जयराम सरडे,मंगेश मुळे,निलेश कदम,दीपक मावळे,देवराज शेंडकर,अरुण गुजर,भिमाजी डेरे,मोरे रोहित,सुरज शिरसाट, विकास मोरे,विकास चौधरी,विकास पोटे, मंगेश शितोळे,निलेश लामखडे,निलेश वरखडे,शरद वरखडे,स्वप्नील लामखडे,शंकर पाटील वरखडे,खंडु लामखडे,नवनाथ लामखडे,सुरेश लामखडे आदि सहकाऱ्यांच्या सह्या आहेत.