Breaking News

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला !

 


मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासुन आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी आशा सेविका,जीम संघटना, रेस्टॉरंट मालक,मंदिर समिती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.त्यानंतर आज मुंबईच्या डबेवाल्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. लॉकडानमध्ये रेल्वेसेवा बंद असल्याने डबेवाल्यांना त्रास सहन करावा लागला परंतु आता सुरू झालेली लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीचं आहे तेव्हा लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी डबेवाल्यांनी राज ठाकरेंकडे केली . . मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे.