Breaking News

शिर्डी न.प.ने पाणीपट्टी,घरपट्टी माफ करावे :- लहुजी सेना

शिर्डी न.प.ने पाणीपट्टी,घरपट्टी माफ करावे :- लहुजी सेना


शिर्डी प्रतिनिधी :
     शिर्डीत कोरोणामुळे व साईमंदिर बंद असल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार सर्व ठप्प आहेत, येथील सर्व दुकानदार, व्यावसायिक व नागरिक त्यामुळे आर्थिक संकटात सापडले असून याच काळात नगरपालिकेने वाढीव पाणीपट्टी त्वरित रद्द करावा, तसेच कोरोना काळातील चालू वर्षाची घरपट्टी माफ करावे ,अन्यथा लहुजी सेना मार्फत शिर्डी नगरपंचायतच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लहुजी सेनेचे समीर आण्णा वीर यांनी एका निवेदनाद्वारे दिला असून हे निवेदन त्यांनी शिर्डी नगरपंचायत चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना नुकतेच दिले.
          या निवेदनात म्हटले आहे की,सध्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत, शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे ,त्यामुळे शिर्डीतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत,असे असताना शिर्डी नगरपंचायतीने मात्र शिर्डीतील रहिवाशांच्या पाणीपट्टी मध्ये मोठी वाढ केली असून या कोरोनाच्या आर्थिक संकटातच घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या पावत्या येथील रहिवाशांना पाठवल्या आहेत व जर घरपट्टी ,पाणीपट्टी वेळेत वसूल झाली नाही तर व्याजासह ती वसूल करण्याचेही फर्मान काढले आहे, त्यामुळे शिर्डीतील नागरिकांमध्ये, दुकानदारा मध्ये, रहिवाशांमध्ये मोठी संतप्त भावना व्यक्त होत असून शिर्डी नगरपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी कोरोणाच्या या आर्थिक संकटात माफ करावी ,अन्यथा लहुजी सेना तर्फे तीव्र आंदोलन शहरात छेडण्यात येईल ,असा इशाराही लहुजी सेनेचे समीर आण्णा वीर यांनी या निवेदनातून दिला आहे, यात समीर वीर यांच्यासह प्रसाद कोते, गिरीश सोनाजी ,संपत जाधव ,जितेश लोकचंदानी, दिपक भांड, प्रवीण पवार ,संतोष आरणे, रवींद्र भोंडगे,
बाबा माडेकर यांच्या या निवेदनावर सह्या असून शिर्डी न.प.च्या मुख्याधिकारी यांना निवेदन देताना हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते,

शिर्डी नगरपंचायत मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे  :
आपले निवेदन स्वीकारले असून नगरपंचायत चे नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्याशी सभेमध्ये चर्चा विनिमय करून निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले,