Breaking News

अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर "एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा..."

 Amruta Fadnavis On Eknath Khadse: खात्री बाळगा, अशी चूक करणार नाही; अमृता  फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांना टोला | 📰 LatestLY मराठी

मुंबई : 'अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?' अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला होता. खडसेंच्या प्रश्नाला आता अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. 

'तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !' असे उत्तर मिसेस फडणवीस यांनी 'टीव्ही9 मराठी'च्या ट्वीटला कोट करुन दिले आहे.