Breaking News

वारणवाडी येथे महिलेच्या विनयभंगप्रकरणी सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल दोघे अटकेत !

वारणवाडी येथे महिलेच्या विनयभंगप्रकरणी सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल दोघे अटकेत.
----------
कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात चौघा जणांविरुद्ध विरोधात गुन्हे दाखल.


पारनेर प्रतिनिधी-
      पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे दोन गटांमध्ये झालेल्या भांडणातून दोन्ही गटांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये एकमेकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे दोन जणांना अटक केली आहे.
वारणवाडी येथील कुटुंबातील वादातुन दोन महिले ना मारहाण व विनयभंग गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पीडित महिलांनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून प्रकरणी सासरे व दीर यांच्या वर विनयभंग केल्या चे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वारणवाडी येथिल रिया खानावळ, फिर्यादी पीडित 25 वर्षीय महिलेने तिच्या पतीला केलेल्या मारहाणीबाबत विचारणा केल्याचा राग मनात ठेवून महिला सासरे व दीर यातील आरोपी अर्जुन किसन कोकाटे वय 55, सुनील अर्जुन कोकाटे वय 33. दोन्ही रा वारणवाडी, ता पारनेर, जि अ.नगर. दोन्ही आरोपी अटक. यांनी महिलेच्या पतीला हाताने मारहाण करत असताना फिर्यादी महिलेने आरोपींना सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी फिर्यादीचे केस ओढून अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना त्यांनी फिर्यादीचे छातीला स्पर्श करून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून बघून घेण्याची धमकी दिली या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसऱ्या पीडित 27वर्षीय महिला, तिचे पती व सासरे हे रिया खानावळी समोर असताना सदर खानावळ वडिलांचे जमिनीत असून तुम्ही येथे रहावयाचे नाही तुम्ही खानावळ बंद करा असे म्हणाल्यावर महिलेचे सासरे त्यांना म्हणाले की सदर जमीन मुलगा सुनील हाच करणार असे म्हणालेचा राग येऊन त्यांनी शिवीगाळ धक्काबुक्की केली असता फिर्यादी व तिचा पती सोडविण्यास गेले असता आरोपी दिलीप अर्जुन कोकाटे, याने फिर्यादीचे छातीला धरून छाती धरून तिस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व फिर्यादीचे पतीस पण मारहाण केली व आरोपी च्या पत्नीने  खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तिचे मंगळसूत्र तोडून नुकसान केले याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे करत आहेत.