Breaking News

चांगले व दर्जेदार रस्ते ह्याच खेड्यातील जनतेच्या ग्रामविकासाच्या वाहीण्या : आ.निलेश लंकेचांगले व दर्जेदार रस्ते ह्याच खेड्यातील जनतेच्या ग्रामविकासाच्या वाहीण्या ;आ.निलेश लंके
---------
राळेगण थेरपाळ ते म्हसे रस्त्यांचा भुमिपुजन सभारंभ संपन्न !


निघोज प्रतिनिधी :
    चांगले व दर्जेदार रस्ते ह्याच खेड्यातील जनतेच्या ग्रामविकासाच्या वाहीण्या असुन त्या एक प्रकारे ग्रामविकासाच्या खऱ्या अर्थाने मानवी शरीरातील धमन्या आहेत.ग्रामिण भागातील शेतकऱ्याचे अर्थिक जीवनमान बदलण्यांसाठी दर्जेदार रस्ते हेच खेडेपाड्यांचे रूप बदलण्यांचा महत्वाचा दुवा ठरणांर आहे.ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते झाले,तरच दळणवळणाच्या सुखसुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील.शेतकऱ्यांचा शेतमाल शहरात ग्राहकांपर्यंत  बाजारपेठेत वेळेवर लवकर जाऊन शेतकऱ्यांच्याही घामाच्या दामाला चांगल्या प्रकारचा भाव मालाला मिळेल व ग्राहकालाही योग्य दरात ताजा भाजीपाला,शेतमाल मिळेल आणि अधिकच्या विक्रीने यातूनच बळीराज्याला नक्कीच  सुखाचे दिवस पाहयला मिळतील असे प्रतिपादन आ.लंके यांनी केले .
     आज राळेगण थेरपाळ ते म्हसे(अंदाजे ६० लक्ष,१.कि.मी)या रस्त्याचे भुमिपुजन मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत निधितून आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलतांना आ.निलेश लंके म्हणांले पारनेर तालुक्यातील सर्व खेड्या,पाडयांत वीज,पाणी,आरोग्य,शिक्षण याच बरोबर दर्जेदार रस्त्यांची कामे करणांर असल्याचे म्हणांले.माणसांच्या शरीरात ज्या प्रमाणे रक्तवाहीन्या रक्ताभिसरणाचे महत्वाचे कार्य करत असतात,त्याचप्रमाणे ग्रामिण भागात रस्ते सुध्दा दळणवळणांचे महत्वाचे कार्य करतात.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सभापती सुदाम पवार हे होते.यावेळी राष्ट्रवादि काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. संजय लाकुडझोडे,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता राहुल मिसाळ,निघोजचे सरपंच ठकाराम लंके,राष्ट्रवादि काँग्रेसचे युवा नेतेअरुण पवार,कोहकडीचे सरपंच डॉ.साहेबराव पानगे,राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले,विघ्नहर्ता पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष साठे,उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब मदगे,सरपंच निलम प्रविण उदमले,उपसरपंच रखमाबाई येळकर,ग्रामपंचायत सदस्य अनिल मदगे,नंदाराज खोमणे,माजी चेअरमन संभाजी मदगे,जय भवानी टायर हाऊसचे उद्योजक विलास मदगे,सुशांत साठे,चेअरमन सुभाष शिंदे,सामाजिक कार्यकर्ते नारायण मदगे आदि व संबधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,युवा नेते अजित मदगे यांनी सर्वांचे आभार मानले.


स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत मधून म्हसे ग्रामपंचायतचे विभाजन झाले,गावातील शालेय मुले,ग्रामस्थांच्या आग्रहास्तव सरकार दरबारी पाठपुरावा करून आमदार निलेश लंके यांच्या हस्ते आज रस्त्यांचे भुमिपूजण झाल्यांने म्हसे गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला,तसेच पारनेर तालुक्यातील शेवटच्या टोकातील कुकडी नदिच्या पट्टयातील इतर गावातील नागरीकांनाही दळणवळणासाठी निश्चितच फायदा होणांर आहे.
------------
(भाऊसाहेब मदगे,जेष्ठनेते व उपाध्यक्ष पारनेर तालुका राष्ट्रवादि काँग्रेस)