Breaking News

मेगा पोलिस भरतीत मराठा समाजाला दिलासा!

 मराठा समाजासाठी 13 टक्के जागा   बाजूला काढणार : अनिल देशमुख


मुंबई/ विशेष प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या पोलिस विभागातील साडेबारा हजार रिक्त जागांच्या भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यातील पोलिस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. त्यांच्यासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपासणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.


अनिल देशमुख म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलिस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची देखील तपासणी केली जाईल. राज्य शासनाचा मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आहे.