Breaking News

मुदत सपंलेल्या अकोल्यातील ५० ग्रामपंचायतीं वर प्रशासकांच्या नेमणुका !

मुदत सपंलेल्या अकोल्यातील ५० ग्रामपंचायतीं वर प्रशासकांच्या नेमणुका!
अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील  ५० ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नियुक्त्या करण्यात   आल्या आहे.
  हे सप्टेंबर 2020 मध्ये मुदत सपंलेल्या अकोले तालुक्यातील ५० ग्रामपंचायती वर प्रशासकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार  अकोल्याचे गटविकास अधिकारी ई .टी .चौधरी यांनी या नियुक्त्या केल्या आहे 
कोरोना महामारी मुळे मुदत सपंलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने शासनाने  ग्रामपंचायती वर प्रशासक   नेमणूक  करण्याचा निर्णय घेतला आहे  या प्रशासक नेमणूक  करण्यावरून गेल्या महिना भर राज्यात राजकीय खलबते सुरू होते  पालकमंत्र्याच्या  सहमतीने राजकीय पक्षीय   कार्यकर्त्यांची यावर वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्नशील होता मात्र विरोधकांनी  तो हाणून पाडला यात  मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होईल असा आरोप करत राज्यात विरोधकांनी या निर्णयाला  आव्हान दिले  होते अखेर सत्ताधारी पक्षाला माघार घ्यावी लागली न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरकारने शासकीय सेवेतील व्यक्तीलाच प्रशासक म्हणून नेमण्याचे आदेश दिल्याने प्रशासक नेमणुकीचा तिढा सुटला  त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाचे आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे  आदेशानुसार गटविकास  अधिकाऱ्यांनी   पंचायत समिती मधील सेवेत असणाऱ्या  वेगवेगळ्या  विभागातील  अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणुका  केल्या आहे या आदेशामुळे  या ५० ग्रामपंचायतीवरील सरपंच, उपसरपंच   व सदस्यांची  राजवट जाऊन आता प्रशासकीय राजवट आली आहे  
तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे नाव व  प्रशासकाचे नाव  पुढील प्रमाणे -

आंबड  ---डॉ.वाळूज उदय दादाभाऊ,
औरगपूर ---श्री.के.डी.सरोदे,
बदगी---श्री.गोदके.ए बी,
बहिरवाडी ---श्री.ए.जी.गहिरे,
बेलापूर---श्री.घारे योगेश,
बोरी---श्री.निघुते बबन,
भोळेवाडी ---श्री.के.एन.गऊल,
चितळवेढे---श्री.सोनवणे.जे.टी,
चैतन्यपूर-- -श्री गोंदके ए.बी,
ढोकरी---श्री.पावसे.आर.डी,
देवठाण---श्री.घोडे जी.जी,
धामणगाव आवारी---श्री इरणक.ए.यु,
धामणगाव पाट- --श्री.डी.एस.बंड,
धुमाळवाडी ---श्री.डी.एस.बंड,
गणोरे- --श्री.धांडे जी.जी,
घोडसरवाडी-  -श्रीमती कचरे एस.बी,
हिवरगाव-  --श्री.गाडेकर.एस.ए,
इंदोरी---श्रीमती साठे.एम.बी,
जांभळे---श्री.बिंद.डी.आर,
जाचकवाडी---श्री.घारे योगेश,
कळंब---श्री.के.जी.लायरे,
कळस खु --चव्हाण एस एम,
कळसबु---श्री.सांगळे एस.बी,
कुंभेफळ -श्री.सांगळे एस.बी,
कोतुळ-श्री.शेवाळ.एम.यु,
लहित बु-श्री.के.जी.लायरे,
मनोहरपूर-श्री.खोलमकर एस.बी,
मन्याळे-श्री.चौरे व्ही.एम,
मेहंदूरी-श्री.चौरे व्ही.एम,
मोग्रस-श्री.के.एन.गऊल,
नवलेवाडी-श्री.सांगळे आर.एस,
नाचणठाव-श्री.पावसे.आर.डी,
निंब्रळ-श्री एस.एच.चव्हाण,
निळवंडे-श्री.एस.एच.चव्हाण,
परखतपूर-श्री.खोलमकर एस.बी,
पांगरी - -शेवाळे एम यु,
पिंपळगाव खांड -दोरगे व्ही बी,
पिंपळगाव निपाणी- गाडेकर एस ए,
पिंपळदरी-बींद डी आर,
रुंभोडी--आर एल नागपुरे,
शेरणखेल-आर एल नागपूरे,
सुगाव खु-श्री खताळ जे डी,
टाकळी- के डी सरोदे,
तांभोळ- एस एस साळुंके,
उंचखडक खु- दोरगे व्ही बी,
उंचखडक बु --डॉ पठाण अशपाक चांद,
वीरगाव- ए यु इरणक,
लिंगदेव-बबन निघूते,
वाघापूर-ए जी गहिरे,
वाशेरे- के डी सरोदे यांची प्रशासक म्हणून
नेमणूक करण्यात आली आहे प्रशासक यांनी  त्यांच्या मूळ पदाचे कामकाज पाहून  प्रशासकाचे कामकाज करणे बंधनकारक  राहणार असून शासनाच्या  निर्णयातील  तरतुदींचे पालन करणे   तसेच   ग्रामपंचयत  अधिनियम 1959 मधील  सर्व अटी शर्तीचे पालन करून कामकाज करणे बंधनकारक राहील दि.१०/९/२०२० पासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १५१ अन्वये सरपंच पदाची निवड होईपर्यत अथवा पुढील आदेश होई पर्यत 
ग्रामपंचायती वर प्रशासक म्हणून  नेमणूक करण्यात येत आली आहे 
----------------