Breaking News

नेवासा तालूक्यात गुरुवारी नवे ५३ कोरोनाबाधीत ! तर एकूण रुग्ण संख्या झाली ११५३ !

नेवासा तालूक्यात गुरुवारी नवे ५३ कोरोनाबाधीत ! तर एकूण रुग्ण संख्या झाली ११५३ ! 


नेवासा तालुका प्रतिनिधी :
       नेवासा तालूक्यात गुरुवार (दि.१०) रोजी नवे ५३ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले असून आता तालूक्याची कोरोनाबाधीतांची एकूण रुग्ण संख्या ११५३ झाली आहे. तालूक्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत दर दिवसाला आकडेवारीत चढ - उतार होत असून चक्रिवादळा सारखा फटका तालूक्यातील प्रत्येक गावाला बसत आहे.
  तालूक्यातील प्रत्येक गावांत दरदिवसाला नविन रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.तर सर्व सामान्य नागरिकांतूनही आता कोरोनाची विशेष काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. सॅनिटायझरचे तर सोडाच पण आता मास्कही तोंडाला लावले जात नाही.ठराविक सुशिक्षित लोकच मास्कचा वापर करतांना दिसून येत असून कोरोनाचा फैलाव वाढत जात असतांना प्रशासनही गाफिल रहात असल्याचे दिसत आहे.
      त्यामुळे तालूक्यातील जनतेनाही आता सुरक्षित राहण्याकडे दुर्लक्ष करते की काय असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे कोरोना या संसर्ग रोगाला जनताच आता "भिक" घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दैनंदिन सर्व व्यवहार हळूहळू पुर्वपदावर येत असतांना कोरोनाची धास्तीच जनता ठेवत नसल्याने रोग्यांवर उपचार करण्यापलिकडे आरोग्य यंञना तरी काय करणार असा सवालही जनतेतूनच उपस्थित केला जात आहे.