Breaking News

आज कोलकाताविरुध्द हैदराबाद यांच्यात लढत, कार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार !

 


आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या योजनांवर टीका झाली. त्यामुळे आज (शनिवारी) येथे होणार्या सनरायझर्स हैदराबादविरूध्दच्या सामन्यात केकेआर विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करेल. केकेआरने मागील सत्राच्या तुलनेत अनेक बदल केले, मात्र बुधवारी मुंबई इंडियन्सविरूध्दच्या सामन्यात त्यांचे आडाखे पाहिल्यानंतर वाटते की, कार्तिकने मागील चुकांमधून धडा घेतलेला नाही.

तडाखेबाज फलंदाजी करणार आंद्रे रसेलच्या मुंबईविरूध्दच्या सामन्यातील फलंदाजीच्या क्रमाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. मागील सत्रात 510 धावा करणारा हा जमैकाचा फलंदाज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्यावेळी केकेआरच्या अडचणी वाढल्या होत्या.

विश्वचषकविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनही चमक दाखवू शकला नाही. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादची स्थितीही पहिल्या सामन्यात चांगली राहिली नाही. बंगळुरूविरूध्द त्यांची मधलीफळी कोलमडून पडली. त्यांचा संघ 10 धावांनी पराभूत झाला. शिवाय हैदराबादसाठी दुसरा धक्का म्हणजे अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता