Breaking News

कोरोना लसीची माकडावरील चाचणी यशस्वी

- भारत बायोटेक कंपनीला मोठे यश

- दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी मिळाली मंजुरी

ಮಂಗಗಳ ಮೇಲೆ ಆಕ್ಸ್‌ಫರ್ಡ್‌ ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಲಸಿಕೆ ಯಶಸ್ವಿ! | Oxford University  Coronavirus vaccine test on monkeys shows promise

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

मेड इन इंडिया असलेल्या भारत बायोटेक कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजेकोव्हॅक्सिनची माकडांवर चाचणी यशस्वी झाली. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली. भारत बायोटेकने मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर ही चाचणी केली. पहिल्या टप्प्यातील कोरोनाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यासाठी भारत बायोटेक कंपनीनेडीसीजीकडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनी लिमिटेड, पुण्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थांच्या सहभागातून ही लस विकसीत करण्यात आली आहे.