Breaking News

अकोल्यात कोरोनाचा ताप कमी होईना, आज पुन्हा २२ नविन बाधित रुग्ण !

अकोल्यात कोरोनाचा ताप कमी होईना, आज पुन्हा २२ नविन बाधित रुग्ण !
------------
 रुग्ण संख्या १० शतकाच्या उंबरठ्यावर


अकोले/ प्रतिनिधी :
अकोल्यात कोरोना  बाधितांची संख्या आता १० शतकाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे आज तालुक्यात २२ करोना  बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाचा ताप कमी होण्याची नाव घेत नाही!
तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ९९०.झाली आहे
 माळीझाप,शेकईवाडी,धुमाळवाडी रोड तसेच राजूर, समशेरपुर, मन्याळे बेलापूर  पाडाळणे, गणोरे मनोहरपूर  ,बेलापूर, सावरगावपाट गर्दणी या ठिकाणी  आज कोरोना  बाधित रुग्ण आढळले
           तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये मन्याळे येथील ३६ वर्षीय पुरूष,,०६ वर्षीय मुलगा, बेलापुर येथील ४५ वर्षीय महीला,राजुर येथील ४१ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, २४ वर्षीय महीला,पाडाळणे येथील ६० वर्षीय पुरूष, १० वर्षीय मुलगी, समशेरपुर येथील ३४ वर्षीय पुरूष, सावरगाव पाट ८० वर्षीय पुरूष, २९ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महीला,गणोरे येथील ५८ वर्षीय पुरूष, अशी १४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर
 खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ,गर्दणी येथील ७५ वर्षीय पुरुष, माळीझाप येथील ०५ वर्षीय मुलगा,शेकईवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष,धुमाळवाडी रोडवरील २३ वर्षीय पुरूष, 
,गणोरे येथील ३० वर्षीय पुरूष, ०२ वर्षीय मुलगी,राजुर येथील ६७ वर्षीय पुरूष, मनोहरपुर येथील ५४ वर्षीय पुरूष, अशा आठ व्यक्तीचाअहवाल पॅाझिटीव्ह आला 
 आज दिवसभरात २२ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
 आज तालुक्यातुन ४५ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.त्याचा उद्या सायंकाळी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
-------