Breaking News

उपचार करताना हलगर्जीपणा केल्याने पञकारांच्या वडीलांना जीव गमवावा लागला

उपचार करताना हलगर्जीपणा केल्याने पञकारांच्या वडीलांना जीव गमवावा लागला 


देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
        राहुरी तालुक्यातील पञकार  गोरक्षनाथ शेजुळ यांच्या वडील भाऊसाहेब गंगाधर शेजुळ यांच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करताना हलगर्जीपणा केल्यामुळे माझ्या वडिलांच्या मृत्यूस झाला आहे. त्यास  जिल्हा आरोग्य प्रशासन(सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर) जबाबदार असल्याचा आरोप करुन या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी   पञकार  गोरक्षनाथ  शेजुळ यांनी केली आहे.
          याबाबत पञकार गोरक्षनाथ शेजुळ म्हणाले की, माझे वडील श्री भाऊसाहेब गंगाधर शेजुळ वय 65, यांना ताप, सर्दी तसेच पाय दुखत असल्याने त्यांची 6 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता उंबरे ता राहुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिडं चाचणी केली, तेथे डॉक्टरांनी पॉझिटिव्ह असल्याचा  अहवाल देत ऑक्सिजन लेव्हल 88-89 असल्याचे रेफर पत्रात नमूद करत पुढील उपचारासाठी जाण्याच्या सूचना केल्या.  वडिलांना  नर्सिंग होम राहुरी फॅक्टरी येथे घेऊन गेलो. मात्र तेथे वडिलांची ऑक्सिजन लेव्हल 83 लागली.  या ठिकाणी ऑक्सिजन सुविधा नसल्याने  सिव्हिल हॉस्पिटल पाठवले. तेथे जागा मिळेल का, नाहीतर खासगीत जातो, असे सांगितले होते, मात्र डॉ खेसमालिस्कर यांनी काळजी करू नका, आमचे पत्र असल्यावर ते जागा करून देतात, असे सांगितले , त्यानंतर रुग्णवाहिकेतून  वडिलांना ऑक्सिजन लावून 3. वाजेच्या सुमारास नगरला आणले. 
                  सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ पूनम यांनी वडिलांचे कागदपत्र घेतले, मात्र 35 मिनिटे काहीही कार्यवाही केली नाही, त्यांनतर मी त्यांना विनंती केली की, वडिलांची ऑक्सिजन लेव्हल कमी आहे, त्यांना त्रास होतोय. डाँ.पुनम यांनी  बाहेर येवून  वडिलांची ऑक्सिजन लेव्हल चेक केली. त्यावेळी 64 लेव्हल  येवून पोहचली होती. मात्र तरीही त्यांनी कोणतेही गांभीर्य दाखवले नाही. येथे जागा शिल्लक नाही. 
               जागा उपलब्ध करण्यात येत आहे. थोडा वेळ थांबा असे सांगितले.वडीलांना जास्त ञास जाणवू लागल्याने   डाँ.पुनम व डॉ खटके तसेच अन्य एक डॉक्टर याना विंनती केली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.पञकारीता श्रेञातील वरीष्ठ पञकारांनी 
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क 
   होत असलेल्या  निष्काळजीपणा बद्दल  संगीतल्या नंतर त्यांनी खाली सूचना केली. त्यानंतर डॉ खटके यांनी वडिलांची ऑक्सिजन लेव्हल तपासली असता ती 54 वर आली होती. त्यानंतर वडीलांना जागा करुन देवून एका  डॉक्टरला व्हेंटिलेटर लावण्याच्या सूचना केल्या.  त्यांनतर संबंधित दोघांनी वडिलांना व्हेंटिलेटर लावले.
              लावण्यात आलेले व्हेंटिलेटर  15 मिनिटांनीत  ऑक्सिजन संपला होता.
हे लक्षात आले.उपस्थित कर्मचारी  एकमेकांवर आरडा ओरडा करत माझ्या  वडिलांचे व्हेंटिलेटर काढले. परंतू पुन्हा व्हेंटीलेटर लावण्याचा विसर पडला.  डाँ.खटके याना संगीतल्या नंतर  या पेशंटला  व्हेंटिलेटर का  लावले नाही? त्यांनतर  20-25 मिनिटांनी नवीन व्हेंटिलेटर वावण्यात आले. त्यानंतर कोणीही लक्ष दिले नाही.काही वेळातच वडिलांना त्रास जाणवू लागला  डॉ. खटके याना सांगितले. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरला पाहण्यास  सांगितले, माञ व्हेंटिलेटर चालू आहे  काळजी  करू नका असे सांगून मला शांत केले. मात्र तरीही वडिलांचा त्रास कमी होत नव्हता, त्यामुळे मी पुन्हा डॉक्टरचे लक्ष वेधले असता डाँ.पूनम आणि संबंधित डॉक्टर मध्ये वडिलांना तपासण्यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर डाँ.पूनम यांनी तपासणी केली, सलाईन देण्यासाठी दोन वेळा हाताला सुई टोचली, मात्र दोन्ही वेळा आऊट गेले, त्यानंतर त्रास वाढल्याने सर्व डॉक्टर घाबरले सर्व जण उठून वडिलांच्या जवळ आले. त्याच वेळी वडिलांना रक्ताची उलटी झाली. डॉक्टरने काहीतरी इंजेक्शन दिले. त्यानंतर पुन्हा एक उलटी झाली.  त्यांनतर वडिलांची हालचाल बंद झाली.
              वडिलांना उलटी कशी झाली विचारले असता डॉ खटके यांनी आम्ही त्यांना जागा केली होती. मात्र यश आले नाही. असे सांगून हात वर केले.माञ उपचार करणाऱ्या  डाँक्टर यांनी हलगर्जीपणा केला आहे.माझ्यासारख्या अनेक मुलांचे वडिलांचे छत्र हरवू नये  त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन संबधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी शेजुळ यांनी केली आहे. 


....त्या डाँक्टरांची चौकशी व्हावी.

 माझ्या वडिलांना ऑक्सिजनची गरज आहे, हे माहिती असताना डॉ खटके, डॉ पूनम , अन्य एक डॉक्टर यांनी हलगगर्जीपण करत दुर्लक्ष केले, त्यामुळे माझ्या वडिलांच्या मृत्यूस जिल्हा आरोग्य प्रशासन(सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर) जबाबदार असल्याचा माझा आरोप असून या प्रकरणी चौकशी व्हावी, त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत,केलेली ट्रीटमेंट तपासणी व्हावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पञकार  गोरक्षनाथ शेजुळ यांनी केली आहे.