Breaking News

डाऊच गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल - सरपंच संजय गुरसळ !

डाऊच गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल - सरपंच संजय गुरसळ !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
शासनाच्या लोकाभिमुख योजना गावात राबवून सर्व सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील विधायक  कामे चालु असुन गावविकास हेच ध्येय डोळ्या समोर ठेवुन शासनाच्या इतरही योजना गावात राबविण्यासाठी सदैव  प्रयत्नशील असल्याचे डाऊच खुर्द गावचे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांनी  सांगितले  . 
 तालुक्यातील डाऊच खुर्द येथिल  खडकवसाहत जिल्हा परिषद शाळा परिसर व मज्जिद परिसर काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ सरपंच संजय गुरसळ ,उपसरपंच दिगंबर पवार यांचे हस्ते पार पडला त्याप्रसंगी औपचारिक  वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सदस्य शंकर गुरसळ, सुर्यमान जाधव ,सलिम पटले , रावसाहेब पवार, चंद्रकांत गुरसळ, बाळासाहेब गुरसळ, मुन्ना सय्यद,अर्जुन होन,मच्छिंद्र गुरसळ, हसन शेला, सजिद शेला, आप्पासाहेब गुरसळ, देवा पवार, माणिक चव्हाण,ग्रामसेवक पाडेकर उपस्थित होते.
. जि.प.शाळा परिसर काॕक्रीटीकरण झाल्याने परिसराच्या प्रसन्नतेत भर पडली वाड्या वस्त्यावरील मुले याच शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे  घेत असुन या ज्ञानमंदिराच्या   शुशोभिकरण दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत करण्यात  येणार असल्याचेही लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ उपसरपंच दिगंबर पवार यांनी सांगितले