Breaking News

पढेगांवला शेती नुकसानीचे पंचनामे रखडले, कर्मचाऱ्यांचा अभाव, मात्र शेतकऱ्यांत संताप !

पढेगांवला शेती नुकसानीचे पंचनामे रखडले, कर्मचाऱ्यांचा अभाव ,मात्र शेतकऱ्यांत संताप !


कोपरगाव प्रतिनिधी-
     मागील आठवड्यात सलग दोन दिवस आलेल्या वादळी पावसाने पढेगांव शिवारातील मका,ऊस ,तूर,बाजरी,भुईमुग,कांद्याची रोपे सगळेकाही भुईसपाट झाली आहे.मोठ्या कष्टाने ऊभी केलेली पिके आडवी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडली असुन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि तहसिलदार योगेश चंद्रे यांनी आदेशच दिले नाही तर स्वतः भर पावसात चिखलात फिरुन पुर्व भागातील नंतर चांदेकसारे भागातील ढगफुटीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र सध्या कर्मचाऱ्यांअभावी पढेगांवचे नुकसानीचे पंचनामे रखडल्यामुळे शेतकरी मोठा संताप व्यक्त करीत आहे.
        मागिल आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वारे आणि पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊनही तिळवणी उक्कडगावचा कार्यभार असलेले कृषी सहायक  आणि कामगार तलाठी यांनी पढेगावचे एक दिवस पंचनामे केले त्यानंतर तिन दिवसापासून कामगार तलाठी गायब असल्यामुळे कृषी विभाग कर्मचारी आणि ग्रामसेवक दैनंदिन सकाळी तलाठी कोतवालांची वाट बघतात आणि निघुन जातात.कारण त्यांचे घोडे तलाठ्यांमुळे अडुन पडले असल्याचे ते सांगतात.त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे.आडवी झालेली पिके तत्काळ कापणी करुन जे हाताला लागेल ते मिळवणे गरजेचे असुनही पंचनामाच न झाल्यामुळे अधिकारी वर्गास आल्यानंतर  काय दाखवायचे या विवंचनेतून बाजरीसारखी पिके आणखी पाऊस झेलत खराब होत आहे.तर मकाची कुट्टीही करता येत नसल्याची समस्या सतावत आहे.
          याबाबत चौकशी करणेसाठी कामगार तलाठी यांना संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.तर दहेगांव(बो.)मंडळाधिकारी दुशिंग यांच्याशी संपर्क केला असता संबंधित तलाठी आणि कोतवाल यांना संपर्क करुन ताबडतोब पाठवतो अशे सांगितले .मात्र कुणीही न आल्यामुळे आजचा दिवसही पंचनाम्याविनाच मावळला.


माझी मका वादळी पावसाने भुईसपाट झाली असुन,अद्याप कुणीही पंचनाम्यासाठी आलेले नाही.पंचनामा होऊन गेला असता तर किमान जनावरांसाठी  कुट्टी तरी करता आली असती अधिकारी न आल्यामुळे  ती काढता येईना,दररोज येता जाता सरपंचांना सांगुनही गावात पंचनामे चालु नसल्यामुळे गप्प बसावे लागत आहे.तरी तातडीने पंचनामे करावे.
------------
शिवाजी कदम शेतकरी,पढेगाव ता.कोपरगाव

अचुक क्षेत्र सांगण्यासाठी महसुल विभागाचा कर्मचारी सोबत पाहिजे.पढेगांव येथील पंचनाम्यासाठी तलाठी नसलेची चर्चा तहसिलदारांसोबत झालेली आहे.उद्या त्यातुन मार्ग काढुन पंचनामे सुरु होतील.बाजरी आणि कुट्टीसाठी मका काढायची असेल तर कृषी सहायकांना पंचनाम्यापुर्वी नुकसान क्षेत्र  प्रत्यक्ष दाखवुन काढली तरी चालेल.
-------------
अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव