Breaking News

पत्रकार रायकर याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वर गुन्हा दाखल करा !

पत्रकार रायकर याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वर गुन्हा दाखल करा
--------
 अकोले पत्रकार संघाची मागणी 


अकोले/ प्रतिनिधी
पुणे येथील पत्रकार  पांडुरंग रायकर यांचा मृत्यू शासनाच्या विविध विभागाच्या समनव्या अभावी झाला आहे त्यांच्या मृत्यूस जबांबदार  असणाऱ्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल   करावा अशी मागणी अकोले तालुका पत्रकार  केली आहे 

या मागणीचे निवेदन  आज अकोले  तहसिलदारांना देण्यात आले पुणे येथील Tv 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दूर्दैवी मृत्यु झाला आहे. कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर असताना शासनाच्या विविध विभागात समन्वयाचा अभाव असल्याने त्यांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होवु शकली नाही. त्यामुळे वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यासारख्या ठिकाणी रुगणवाहिका उपलब्ध न होणे ही धक्कादायक बाब असुन या प्रकाराची चौकशी होवुन पत्रकार रायकर यांच्या मृत्युस जबाबदार असणार्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अकोले तालुका पत्रकार संघाने अकोल्याचे तहसिलदार मुकेश कांबळे व येथिल पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. संघाने या घटनेचा निषेध केला आहे. अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास तुपे, सेक्रेटरी सुभाष खरबस, विश्वस्त प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, नंदकुमार मंडलिक, श्रीनिवास रेणुकादास, राजेंद्र जाधव, आबासाहेब मंडलिक, सचिन खरात, आकाश देशमुख, हरिभाऊ आवारी, ललित मुतडक, भगवान पवार व आदी सदस्य यावेळी उरपस्थित होते.
-------